Nashik News Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: पुढाऱ्यांना गाव बंदी; शेतकऱ्यांनी लावले गावाच्‍या चारही बाजूला फलक

पुढाऱ्यांना गाव बंदी; शेतकऱ्यांनी लावले गावाच्‍या चारही बाजूला फलक

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैरान झाला आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) जिल्‍ह्याच्या सटाणा तालुक्यातील मुंदवाड गावच्या शेतकऱ्यांनी (Farmer) चक्क पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक लावले आहे. (Live Marathi News)

सध्या कांद्याला (Onion) कवडीमोल भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे इतर शेतमालाला भाव मिळत नाही. भारतीय अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात असून शेतकऱ्यांची मात्र दैना झालेली आहे. त्यामुळे निष्क्रिय ठरलेल्या राजकीय पुढाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वच गावात बंदी करत पुढाऱ्यांनी, लोकप्रतिनीधींनी शासनाला जाब विचारायला हवा; असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तर कांदा फेकून मारणार

आजपासून आमदार, खासदार, मंत्री, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी मुंजवाड गावात प्रवेश करु नये; प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल अशा आशयाचे फलक गावाच्या चारही बाजूला लावण्यात आलेय.शेतकरी क्रांती मोर्चा व राज्य कांदा उत्पादक शेतकरी यांनी लावलेल्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी फलकाची मात्र सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा होऊ लागलीय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT