Dhule News: गावगुंडांचा त्रास, पोलिस चौकी उभारा; शिवसेनेतर्फे आंदोलन

गावगुंडांचा त्रास, पोलिस चौकी उभारा; शिवसेनेतर्फे आंदोलन
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे शहरातील गजानन कॉलनी परिसरात गावगुंडांचा आहे. येथे नेहमीच वाद सुरू असतात. या कारणाने या ठिकाणी (Police) पोलीस स्टेशन होण्याच्या मागणीसाठी (Shiv Sena) शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Dhule News
Akola News: साईड देण्यावरून वाद; एसटी बस चालकाला खासगी बस चालकाकडून मारहाण

धुळे (Dhule) शहरातील गजानन कॉलनी परिसरामध्ये मद्यपी त्याचबरोबर इतर नशा करणाऱ्या गावगुंडांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असतो. या कारणाने या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस स्टेशन व्हावे; अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे होती. येथे छोटीशी पोलीस चौकी फक्त उभारण्यात आली आहे. परंतु या पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने या ठिकाणी गैरप्रकार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने लावण्यात आला आहे.

Dhule News
Jalgaon News: ‘उष्माघात’सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू; चक्‍कर येवून कोसळले

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भातील दखल घेत या ठिकाणी पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात यावी; कायमस्वरूपी या ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहिल्याने या ठिकाणी होणारे गैरप्रकार टाळण्यास मदत होईल. यासाठी शिवसेनेतर्फे गजानन कॉलनी परिसरात असलेल्या छोट्याशा पोलीस चौकी बाहेर निदर्शने करून आक्रोश व्यक्त केला आहे. तसेच या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी देखील या शिवसैनिकांनी केली असून या संदर्भातील सकारात्मक भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com