Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News : अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त

Nashik News : नाशिकच्या वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळणारे शिवारात अवैध गावठी दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) :  नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळणारे शिवारात अवैध गावठी दारू निर्मिती केली जात असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यात एका व्यक्तीला (Manmad) ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे. (Live Marathi News)

नाशिकच्या वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळणारे शिवारात अवैध गावठी दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Police) पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी विशाल उर्फ सोन्या साहेबराव जाधव हा गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचे आढळून आले. याशिवाय येथे २०० लीटरचे एकूण ७ ड्रम, त्यात गावठी दारू तयार करण्याचे १४०० लीटर रसायन, २० लीटरचे ५ ड्रम व त्यामध्ये एकूण १०० लीटर गावठी हातभट्टीची आंबट वासाची तयार गावठी दारू, गॅसची टाकी व शेगडी असे साहित्य आढळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी छापा टाकलेल्या दारूच्या हातभट्टीवर तयार केलेली १०० लिटर गावठी दारू तसेच त्यासाठी लागणारे रसायन असा एकूण ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर दारूसाठी लागणारा काळा गूळ पुरवणारा वडनेर-भैरव येथील दुकांदारावर कारवाई करण्यात येऊन त्याच्या दुकानातून २१ हजार ६०० रुपयांचा गूळ जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT