Nashik Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये गावकऱ्यांनी गावच काढलं विकायला, सरकारवरही केले गंभीर आरोप

Village for Sale In Nashik: माळवाडी गावात ५३४ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी शेती करतात.

अभिजीत सोनावणे

नाशिक : शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ संपूर्ण गाव विकण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी गावकऱ्यांनी सरकारला संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला आहे. कांद्यासह अन्य शेतमालाला भाव मिळत नसल्यानं उदरनिर्वाह करण्यासाठी गावच विकण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

माळवाडी गावात ५३४ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी शेती करतात. मात्र कांद्यासह अन्य पिकांना मागील ३ ते ४ वर्षांपासून अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवरच अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  (Latest Marathi News Update)

Village for Sale In Nashik

मात्र आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून आलेल्या पैशांतून उदरनिर्वाह करू अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने माळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येत संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला.

शेतकऱ्यांच्या गरजा भागवणे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याइतका तरी शेतमालाला भाव मिळवून द्यावा. अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे आणि ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी माळवाडी गावकऱ्यांनी केली आहे.

गावकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे. यात म्हटलं की, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आम्ही गंभीर आर्थिक संकटात सापडलो आहोत. सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आमच्या हिताचे निर्णय न घेता मतदार वाढवण्यासाठी ग्राहक हिताचे निर्णय आपल्यामार्फत सातत्याने घेतले जात आहेत.मात्र यामुळे आमचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. मात्र आम्ही आत्महत्या करणार नसून संपूर्ण गाव विक्री करुन उदनिर्वाह करुन सुखी जगणार आहोत. त्यासाठी आता आमचं गाव विकत घेऊन आम्हाला सुखी करावं, असं गावकऱ्यांनी पत्रात लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT