Malegaon x
महाराष्ट्र

Shocking : ४ वर्षीय मुलीला बापानं नदीपात्रात फेकलं, नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

Malegaon News : मालेगावच्या टेहरे चौफुलीवरील गिरणा नदीपात्राजवळ धक्कादायक प्रकार घडला. पोटच्या ४ वर्षीय पोरीला नदीच्या पाण्यात फेकून एका व्यक्तीने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

Yash Shirke

मालेगावमध्ये एका बापाने आपल्या ४ वर्षीय मुलीला गिरणा नदीत फेकून दिलं आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे मुलगी आणि तिचा बाप दोघेही वाचले असून पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे.

अजय सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Malegaon News : नाशिकच्या मालेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावमध्ये एका व्यक्तीने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकले. या व्यक्तीने पाण्यात उडी मारत स्वत: देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या एकूण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बापाने आपल्या पोटच्या पोरीला गिराणा नदीपात्राता फेकून दिले. त्यानंतर चार वर्षीय मुलीच्या बापाने स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मालेगावच्या टेहरे चौफुलीवरील गिरणा नदीपात्राजवळ घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.

मुलीला नदीच्या पाण्यात फेकत स्वत: आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या घरात प्रचंड वाद सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. बायको आपल्या मुलीकडे लक्ष देत नसल्याच्या रागातून या व्यक्तीने ही धक्कादायक कृती केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एका व्यक्तीने मुलीला नदीत फेकून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे स्थानिक तरुणांनी पाहिले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या तरुणांनी गिरणा नदीपात्रामध्ये उड्या मारल्या आणि मुलीसह तिच्या बापाला वाचवले. मुलीला स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी मुलीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT