नाशिकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी Saam tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

कांदे - भुजबळ वादानंतर आता देवळाली विधानसभा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार योगेश घोलप आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशक - महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. कांदे - भुजबळ वादानंतर आता देवळाली विधानसभा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार योगेश घोलप Yogesh Gholap आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे Saroj Ahire यांच्या विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली आहे. मी आमदार असलेल्या कार्यकाळात मंजूर करून आणलेल्या विकासकामांचं श्रेय विद्यमान आमदार सरोज अहिरे घेत असून मतदारसंघातील नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी आमदार योगेश घोलप यांनी केला आहे.

हे देखील पहा-

यापुढे मी मंजूर करून आणलेल्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अहिरे यांनी घेण्याचा केल्यास त्याचा उद्घाटन कार्यक्रम शिवसेना स्टाईलने उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळत उद्घाटन केलेली कामं माझ्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे सांगत मी ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून महाविकास आघाडीमधील नेत्यांचे अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

SCROLL FOR NEXT