Nashik Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने उधळला गुलाल; १ लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळाल्याने जल्लोष

Nashik News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक लोकसभा मतदार संघातील चित्र स्पष्ट होत झाले आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असताना अनेक ठिकाणी आता चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यात नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला १ लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Results) होत असून दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक लोकसभा मतदार संघातील चित्र स्पष्ट होत झाले आहे. मतमोजणीच्या सात- आठ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आघाडी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने आघाडीवर असल्याने नाशिकमध्ये शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.  

ढोल वाजवत जल्लोष 

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून आणि ढोल वाजून जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीने टाकलेला विश्वास जनतेने सार्थ केला असून जबाबदारी वाढल्याचे म्हटले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT