Nashik Breaking News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Breaking News : थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस, मोठी दुर्घटना टळली

प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस थेट नदीपात्रात शिरली.

साम टिव्ही ब्युरो

Nashik Breaking News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नदी-नाल्यांना पूर आलाय. अशातच शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस थेट नदीपात्रात शिरली. बसला (Bus Accident) ब्रेक न लागल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. शहरातील गाडगे महाराज पुलाजवळ ही घटना घडली आहे. (Nashik Todays News)

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. गोदापात्रात शिरलेली बस बाहेरील राज्यातील असल्याची माहिती आहे. बस नदीपात्रात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. (Nashik Bus Accident News)

प्राप्त माहितीनुसार, परराज्यातील पर्यटकांना नाशिक येथे घेऊन आलेली बस अचानक गोदापात्रात शिरली. शहरातील गाडगे महाराज पुलाजवळ आल्यानंतर बसचे ब्रेक न लागल्याने सदरील घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT