Massive Transport Plan for Kumbh Mela; Administration Deploys 4,500 Buses 
महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन, 4,500 बसेस धावणार; दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळा प्रशासनाने ४,५०० बसेस आणि विस्तृत पार्किंग सुविधांसह एक भव्य वाहतूक योजना तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमादरम्यान दररोज ३३ लाखांहून अधिक भाविक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.

Bharat Jadhav

  • भाविकांच्या वाहतुकीसाठी तब्बल ४,५०० एसटी बस तैनात

  • रामकुंड, त्र्यंबकेश्वर आणि बाह्य वाहनतळांवर विशेष वाहतूक व्यवस्था

  • दररोज सुमारे ३३ लाख भाविकांच्या प्रवासाचे नियोजन

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याच प्रकारची कमतरता भासली नाही, पाहिजे यासाठी प्रशासन जोरदार कामाला लागले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा प्रशासनाने एक मोठा प्लॅन आखला आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे ४५०० बस तैनात करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून दररोज तब्बल ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक होणार आहे. (MSRTC special bus services for Kumbh Mela 2027)

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वाहतूक आराखड्यात अंतर्गत प्रवासी उतरविण्याची ठिकाणांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात बाह्य वाहनतळ, रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळांपासून विशेष बस सोडण्यात येणार आहे.

यात नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी ९०० बस नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी एक हजार ४८५ बस आणि तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी ३२५ बस उपलब्ध असणार आहेत.गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन २९० बस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेद्वारे २४ तासांत सुमारे ४०७ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक होईल अशी शक्यता आहे.

यासह देशभरातून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वेस्थानकांना बससेवेशी जोडण्यात येतील. त्यासाठी एक हजार ५०० बसचे नियोजन केले आहे. यातील ५२० बस रेल्वेस्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि ६८० बस रेल्वेस्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. तसेच ३०० बस राखीव ठेवण्यात येतील. यातून दररोज सुमारे ८.२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता येणार असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT