Nashik Accident Saam TV News
महाराष्ट्र

Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

Horrific Car Crash : नाशिकमधील कळवण फाट्याजवळ लग्नावरून परतणाऱ्या कारचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू. भरधाव वेगात असलेली कार बंगल्यावर आदळल्याने दुर्घटना घडली. पोलीस तपास सुरु असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Nashik car accident, Kalwan Fata crash : नाशिकमध्ये कळवण फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण कार अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकहून सटाण्याकडे जाणारी कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बंगल्यावर जाऊन आदळली. अपघात इतका भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एका चिमुकलीसह अन्य दोघांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झालेले सर्वजण देवळा येथील रहिवासी असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण नाशिक येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहून परतत होते. कळवण फाट्याजवळ हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने आणि नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र कारमधील सर्व प्रवाशांना वाचवणे शक्य झाले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत ३ मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातमधील इतर जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीन जणांनी प्राण सोडले. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT