Nashik: कांदा व्यापाऱ्यांवर IT चे छापे; १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता अभिजीत सोनवणे
महाराष्ट्र

Nashik: कांदा व्यापाऱ्यांवर IT चे छापे; १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी आयकर विभागाकडून छापे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या धाड सत्रांमध्ये कांदा व्यापाऱ्यांकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या आयकर विभागाने मागील आठवड्यात पिंपळगावमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर टाकलेल्या धाडसत्रात कांदा व्यापाऱ्यांचे काळे कारनामे उघड झाले आहेत. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते.

हे देखील पहा -

या व्यापाऱ्यांचे कार्यालय,आडत, निवासस्थानासह बँक खात्यांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला तब्बल 24 कोटींची रोख रक्कम या कांदा व्यापाऱ्यांकडून जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना जवळपास 17 ते 18 तास लागले. त्यानंतर आता ज्या व्यापाऱ्यांवर छापे पडले आहेत, त्यांच्याकडे तब्बल 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. त्यांनी हा काळा पैसा जमीन खरेदीमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. या कारवाईचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असून आणखी मोठ्या प्रमाणात कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटननेने केली आहे.

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर 5 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेल्या कांद्याच्या भावात काहीशी घसरण झाली. धाडसत्रामुळे कांदा व्यापारी बॅकफूटवर गेल्याने कांदा पडून राहिल्याने यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या धाड सत्रावरून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली आहे.

एकूणच कांदा व्यापाऱ्यांवरील धाड सत्रांवरून समर्थन आणि विरोधही अशा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असल्या तरी आयकर विभागाच्या छाप्यात कांदा व्यापाऱ्यांकडे कोट्यावधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे समोर आल्याने या प्रकरणातलं गांभीर्य वाढलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आयकर विभाग पुढे काय कारवाई करतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT