ashok kharat exploitation case Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राला हादरवणारं कांड, अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश; FIR मधून लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर

ashok kharat exploitation case : महाराष्ट्राला हादरवणारं कांड समोर आलं आहे. अशोक खरातच्या विरोधातील FIR मधून लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील समोर आला आहे.

Vishal Gangurde

अशोक खरातच्या विरोधात महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केलेत

एफआयआरमधून त्याच्या शोषणाचा ठराविक पॅटर्न उघड झालाय

अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांचं शोषण केल्याची शक्यता

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या एक एक काळ्या कृत्याचा पर्दाफाश होऊ लागला आहे. खरातच्या कृत्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. एसआयटीने या प्रकरणात वेगाने तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात लैंगिक शोषण झालेल्या पीडित महिलेने अशोक खरातच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीची FIR कॉपी साम टीव्हीच्या हाती आली आहे.

पीडित महिलेने अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील सांगितला आहे. खरातने १०० हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. या नराधमाने कोट्यवधींची माया कमावली होती. त्याचे नाशिक, अहिल्यानगरमध्ये मालमत्ता होती. या तक्रारीतून अशोक खरातच्या काळया कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे.

तक्रारीनुसार, 'मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा', असं अशोक खरात पीडित महिलेला बोलायचा. महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ पुतपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कवडवट -खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा'.

महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आल्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण सुरू करायचा. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. १०० हून अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती आहे. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा, अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT