Nashik Fire News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Fire News: घराला आणि गोदामाला भीषण आग; ५० पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक, जुने नाशिक परिसरातील घटना

Fire In Old Nashik Area: जुने नाशिक परिसरात घराला आणि गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये ५० पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

Rohini Gudaghe

तबरेज शेख साम टीव्ही, नाशिक

जुने नाशिक परिसरात घराला आणि गोदामाला भिषण आग लागली. या आगीमध्ये ५० पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ही आगीची घटना सकाळी सात ( Nashik Fire News) वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू (Nashik News) होते.

या आगीचे स्वरूप अतिशय भीषण होते. संपूर्ण परिसरात धुराचे मोठमोठे लोट निघत होते. या आगीमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. संपूर्ण परिसरात धूर पसरला (Fire In Old Nashik Area) होता. आग विझविण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत ५० दुचाकींचा जळून कोळसा झाला आहे.

पुण्यातील घटना

पुण्यातील प्रसिद्ध भोरी आळीमध्ये असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे. आज पहाटे ५ वाजता पुण्यातील रविवार पेठ येथे असलेल्या रामसुख (Bikes Burn) चेंबर्स, भोरी आळी येथे तीन मजली व्यावसायिक इमारतीत तळमजल्यावरील दुकानामध्ये आग लागली होती.

अग्निशमन दलाच्या ६ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्याचे काम सुरु होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीच्या (Fire News) तळमजल्यावर काही दुकाने आहेत. सोमवारी (२२ एप्रिल) पहाटे ५ वाजेच्या सुमारास यातील काही दुकानांना अचानक आग लागली होती.

रत्नागिरीमध्ये मुंबई -गोवा हायवेवर लांजा येथे बर्निंग टेम्पोचा थरार पाहायला मिळाला आहे. लांजा पेट्रोल पंप येथे टेम्पोने अचानक पेट घेतला. हा टेम्पो गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळत (Latest Fire News) आहे. स्थानिकांकडून टेम्पोला लागलेली आग विझावण्याचे प्रयत्न सुरु होते. या आगीमध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

Chhagan Bhujbal : ओबीसी मेळावा; छगन भुजबळांची तोफ आज नागपुरात धडकणार | VIDEO

Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

Latur Tourism : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला फार कमी लोकांना माहित असेल, लातूरला जाऊन एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT