Nashik Fire News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Fire News: नाशिकच्या सिन्नरमध्ये कंपनीला भीषण आग, धुराचे लोट आकाशाला भिडले

Nashik Fire News: नाशिकमधून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. नाशिकच्या सिन्नरमधील औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या वसाहतीमधील आदिमा ऑरगॅनिक्स कंपनीला भीषण आग लागली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत सोनवणे, नाशिक

Nashik Sinnar Fire News:

नाशिकमधून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. नाशिकच्या सिन्नरमधील औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या वसाहतीमधील आदिमा ऑरगॅनिक्स कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या धुराचे प्रचंड लोट आकाशाला भिडले आहे. या भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिन्नरच्या मुसळगावमधील औद्योगिक वसाहतीत कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुसळगावमधील आदिमा ऑरगॅनिक्स कंपनीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहे. या कंपनीला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमनदल घटनास्थळी

या कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. कंपनीच्या परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमनदलाला माहिती दिली. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच माळेगाव एमआयडीसी, सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

कंपनीला लागलेली इतकी भीषण होती की, नाशिकहून देखील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. कंपनीत कुणी कामगार अडकलेत का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Muffins Recipe: लहान मुलांच्या बर्थडेसाठी घरच्या घरी बनवा मऊ आणि चॉकलेटी मफिन्स; जाणून घ्या सोपी रेसिपी

HRA Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA नियमांत मोठा बदल, पगारात होणार थेट वाढ की फटका? जाणून घ्या काय झाला बदल

Heart Attack: कमी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅक येतो? ही 5 लक्षणं दिसल्यास समजा हृदयावर होतोय गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

SCROLL FOR NEXT