नाशिक : शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचा पैसा परप्रांतियांनी ओरबाडून नेलाय. हा धक्कादायक प्रकार घडलाय नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावात. हे भामटे आहेत थेट पश्चिम बंगालचे. गावात घर नाही, शेती नाही , कुठलीही कागदपत्र नाहीत तरीही या भामट्यांनी योजनेचा पैसा लाटला. हा प्रकार एकदोन नव्हे तर तब्बल पाच वर्ष सुरू होता. हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.
शेतकऱ्यांच्या पैशांवर परप्रांतीयांचा डल्ला
परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करुन हप्ता लाटला
पीएम किसान योजनेचे 3 लाख 62 हजार रुपये लाटले
अॅग्रीस्टॅक कार्डच्या पडताळणीवेळी प्रकार उघड
बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे
राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला
ई-केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद
2020 मध्ये पश्चिम बंगालमधील भामट्यांनी परराज्यातील सायबर कॅफेतून पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र शेतकऱ्यांना शेतीसंबंधित ओळखपत्र देण्यासाठी आणलेले अॅग्रीस्टॅक कार्ड तयार करताना हा घोटाळा उघडकीस आला. राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर परप्रांतीयांनी पैसे कसे लाटले? त्यावर साम टीव्हीने सवाल उपस्थित केले आहेत.
परप्रांतियांनी कसा लाटला पीएम किसानचा पैसा?
गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे?
ANOWARA हे शेतकऱ्याचं नाव कसं असू शकतं?
ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली नाही का?
पडताळणी न करताच बोगस लाभार्थ्यांच्या नावाने बँक खात्यात पैसे कसे पाठवले?
बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का नाही?
बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसुल करणार का?
बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण?
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पीएम किसान योजनेतच हा घोटाळा झाल्याचं समोर आल्यामुळे हे प्रकरण फक्त नाशिक पुरतंच मर्यादित आहे की घोटाळेबाजांचं जाळं देशभर पसरलंय. याचा शोध घेण्याची गरज आहे. एवढंच नाही या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणि कागदपत्रांची योग्य पद्धतीने पडताळणी न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.