Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : मुलभूत सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

Nashik Nandgaon News : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जामदरीच्या खडके वस्तीवरील आदिवासी जनतेला गेल्या ३५ वर्षां पासून मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : आजही अनेक गवे अशी आहेत; जेथे मूलभूत सुविधा मिळत नाही. लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडून देखील उपयोग होत नाही. अशाच (Nashik) नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील जामदरीच्या खडके वस्तीवर असलेल्या मूलभूत सुविधांसाठी येथील नागरिकांनी मतदानावर (Election) बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन देखील प्रशासनाला दिले आहे. (Breaking Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील जामदरीच्या खडके वस्तीवरील आदिवासी जनतेला गेल्या ३५ वर्षां पासून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. खडके वस्तीवर साधारण तीनशे ते चारशे आदिवासी राहतात. मात्र वस्तीवर दळणवणासाठी रस्ता नाही, पिण्याचे पाणी मिळत नाही, शिक्षणाची सुविधा नाही. त्यासाठी जंगलातून, पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. जातीचे दाखले मिळत नसल्याने शबरीमाता घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. अशा विविध सोयी अभावी खडके वस्ती वंचित आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तहसीलदारांना निवेदन 

आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याने येत्या (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या सुविधांकडे लक्ष देण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी दिंडोरी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसिलदारांना निवेदन देऊन केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT