Maharashtra crime news family of four found dead एोोस ऊ शोीोूपग ळाैे
महाराष्ट्र

Nashik : सामूहिक आत्महत्याने नाशिक हादरले, एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवले

Why did Nashik family commit suicide police investigation नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे एका कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

  • नाशिकमध्ये आई-वडील आणि दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

  • ४० वर्षीय पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह बेडवर आढळले.

  • पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलेत.

अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik family suicide latest updates Devla Taluka : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे धुरळा उडाला असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये अख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळलेय. नाशिकमधील देवळा तालुक्यातील फुले माळावाडी येथे चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्याचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्यानंतर आत्महत्याची नोंद करत तपास सुरू केला. पोलिसांकडून आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याचे कारण का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. माळवाडी येथील ४० वर्षांचा व्यक्ती, ३५ वर्षांची त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह फुले माळवाडीमध्ये घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे.४० वर्षांच्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तर बायको अन् दोन मुलांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळले. यात देवळा पोलीस पोलीस निरीक्षक, उप पोलीस निरीक्षक सह पोलीस कॉनस्टेबल हे घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT