Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: नाशिकमध्ये रक्तरंजित कांड! भरचौकात तरुणावर सपासप वार करत हत्या, दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड

Nashik Police: नाशिकमध्ये तरुणाची टोळक्यांनी धारधार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केली. संत कबीर नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये टोळक्यांनी तरुणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको परिसरातील खुंटवड नगरमध्ये राहणाऱ्या तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमधील रस्त्यावर हा रक्तरंजीत कांड घडला. अरुण राम बंडी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अरुण बंडी शनिवारी रात्री भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमध्ये आला होता. या ठिकाणी जुन्या वादातून सातपुरच्या टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अरुणचा जागीच मृत्यू झाला. अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. या टोळक्याने परिसरातील दोन दुचाकीची तोडफोड देखील केली.

या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते. पोलिसानी ३ संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले तर दोघे जण फरार असून त्यांचा शोध घेत आहेत. अरुणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. रुग्णालयाबाहेर त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सरकारवाडा पोलिस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हत्येाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून मिटकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला; शिरसाटांनाही सुनावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT