Nashik woman allegedly kills live-in partner with lover's help saam tv
महाराष्ट्र

नाशिक हादरलं ! प्रियकराच्या मदतीनं महिलेनं लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराला संपवलं; नंतर कसारा घाटात फेकला मृतदेह

Woman Killed Live-In Partner: नाशिकच्या पाथर्डीफाटा परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या वसंत सातपुते यांच्या हत्येप्रकरणी महिलेसह तिचा प्रियकर आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आलीय. हत्या केल्यानंतर मृतदेह कसारा घाटात फेकला होता.

Bharat Jadhav

  • नाशिकमध्ये महिलेने प्रियकराच्या मदतीने लिव्ह इन पार्टनरची हत्या

  • पाथर्डीफाटा येथे लिव्ह इन पार्टनरच्या हत्या प्रकरणात चौघांना अटक

  • हत्या केल्यानंतर मृतदेह कसारा घाटात फेकल्याचा आरोप

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला महिलेने प्रियकराच्या मदत घेत त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमधील पाथर्डीफाटा येथे घडली. नवऱ्याची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेनं मृतदेह तब्बल १८ तास घरात ठेवला. त्यानंतर मध्यरात्रीची वेळ साधत मृतदेह कसारा घाटात फेकला.

वसंत गोरखनाथ सातपुते अशी हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. वसंत सातपुते याची हत्या पाथर्डीफाटा येथील एका रो-हाऊसमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह कासारा घाटात फेकण्यात आला. या हत्याप्रकरणात पोलिसांनी महिलेसह तिचा प्रियकर आणि त्याच्या दोघा साथीदारांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, वसंत सातपुते यांना मद्यपान आणि जुगाराचं व्यसन होतं. तसेच त्यांच्या अनैतिक संबंधात ते अडथळा ठरत होते. याच कारणातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेनं प्रियकराच्या मदतीने पहिल्या जोडीदाराच्या हत्येचा कट रचला. शेख (४४, रा. साई आंगण रो-हाउस) हिने राहणाऱ्या संशयित आरोपी हसीना हबीब तिचा प्रियकर संशयित साहिल रफिक शहा (२३, रा. घरकुल वसाहत, वडाळा) याच्यासोबत सातपुते याच्या खुनाचा कट रचला.

साहिलने त्याचा साथीदार मोईन मुख्तार शहा (२४, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक), सरफराज अबरार सय्यद (२२, रा. नानावली, जुने नाशिक) यांच्या मदतीने त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सातपुते याचा ६ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरात धारदार चाकूने गळा चिरून खून केला.

जोडीदार बेपत्ता झाल्याचा महिलेकडून बनाव

सातपुते यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने साहिल, मोईन, सरफराज यांनी मृतदेह गोणीत टाकून थेट कसारा घाटात नेऊन फेकला. यानंतर हसिना हिने कोणाला तिच्यावर संशय येऊ नये म्हणून सातपुते बेपत्ता झाल्याचा बनाव केला. फिर्यादी कडवे यांना तिने फोन करून तसे सांगितले होते, असे फिर्यादीत म्हटलंय. त्यानंतर रविवारी (दि.१६) त्यांनी सातपुते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.

महिलेच्या बनावाचं बिंग कसं फुटलं?

सातपुते बेपत्ता झाल्याचा बनाव हसिना हिने केला. यासाठी त्यांचे दाजी कडवे यांना तिने फोन करून माहितीही दिली. जेव्हा पोलिसांनी हसिनाकडे चौकशी केली, तेव्हा तिचे बोलणे व देहबोली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. यावेळी सातपुते यांच्या खुनाचा कट रचल्याचं सांगितलं.

त्यानंतर तिला अटक करत तिला न्यायालयात दाखल केलं. सातपुते हे यापूर्वी स्वतःची रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. ते हसिनासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दरम्यान, हसीना आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या संबंधात सातपुते यांचा अडथळा येऊ लागल्याने त्यांनी दोघांनी साथीदारांच्या मदतीने त्यांचा कायमचा काटा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT