Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत! दगडफेक करत वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Nashik Latest News: स्वातंत्र्यदिनानिमित्त कडक बंदोबस्त असताना शहरात चारचाकी गाड्या फोडल्याचा प्रकार समोर आला आहे

Gangappa Pujari

तबरेज शेख प्रतिनिधी...

Nashik Crime News: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गावगुंडांची दहशत पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त कडक बंदोबस्त असताना शहरात पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला असून चारचाकी गाड्या फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकीकडे देशभरात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोश सुरू असतानाच नाशिकमध्ये (Nashik) मात्र गावगुंडांची दहशत माजवल्याचे पाहायला मिळाले. शहरातील मखमलाबाद रोड परिसरात दगडफेक करत अज्ञातांकडून दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.

पहाटेच्या सुमारास परिसरातील इनोव्हा आणि अल्टो कारची तोडफोड करण्यात आली असून या घटनेत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात कडक बंदोबस्त असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चार दिवसांपूर्वी झाली होती दोघांची हत्या..

दरम्यान, नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील अंबड परिसरात दोघा भावांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. लहान मुलांच्या भांडणाचा वाद वाढत गेल्याने या हत्या झाल्याचे समोर आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT