Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : हाणामारीत जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

Nashik News : उद्धव निमसे यांच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून निमसे यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही धात्रक कुटुंबीयांची भूमिका घेतली आहे

अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक

नाशिक : पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक आणि भाजप नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यात निमसे यांच्या मारहाणीत गंभीर झालेल्या राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे निमसे हे फरार झाले आहेत. 

नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात पोळ्याच्या दिवशी दोन गट आमनेसामने सामने आले होते. यात भाजपचे नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे यांचे कार्यकर्ते भिडले होते. दरम्यान निमसे यांच्याकडून धोत्रे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या हाणामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणात नाशिकच्या आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. निमसे यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली. 

खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर निमसे फरार 

दरम्यान घटनेतील मुख्य आरोपी असलेले उद्धव निमसे आणि त्यांचे काही साथीदार हे अद्याप फरार आहेत. जखमी राहुल धोत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यानंतर उद्धव निमसे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून योग्य ती कारवाई सुरू असून गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

नातेवाईक आक्रमक 

दरम्यान या घटनेत जोपर्यंत मुख्य आरोपी उद्धव निमसे अजूनही फरार आहे. मात्र धोत्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून निमसे यांना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही; अशी भूमिका धोत्रे यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. तर कालपासून मयत राहुल धोत्रेचे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टात होणार सुनावणी

Ahilyanagar Corporation : अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार; अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता

Mumbai Real Estate : घरांच्या विक्रीत मुंबई नंबर १, वाढत्या किंमतींनंतरही विक्रीचा आलेख चढता

Diwali 2025 : दिवाळीला घरी किती दिवे लावावे? वाचा शुभ आकडा

Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT