Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : जुन्या वादातून युवकाची हत्या; पाथर्डी गावात टोळक्याकडून हल्ला

Nashik News : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदेश साळवे याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका युवकाला थांबवत त्याच्यावर हल्ला चढविला. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पाथर्डी (जि. नाशिक) या गावातील नंदेश विजय साळवे (वय २०) असे घटनेत मृत्युमुखी (Nashik) पडलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदेश साळवे याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. (Crime News) यानंतर जखमी नंदेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. 

गावात घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांनी (Police) तपास केला असता जुन्या भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT