Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: शिर नसलेला मृतदेह आढळला; आरोपींना ताब्‍यात घेतल्‍यावर हत्‍येचे कारण आले समारे

शिर नसलेला मृतदेह आढळला; आरोपींना ताब्‍यात घेतल्‍यावर हत्‍येचे कारण आले समारे

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह आला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान (Police) पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र या घटनेचा भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी या खुनाच्या (Nashik News) गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे, योगेश जगदीश संगमनेरे, शेतमजुर शरद वसंत शिंदे, अलीम लतीफ शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. (Tajya Batmya)

खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत असून या ठिकाणी त्यांनी मागील महिन्यात पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हापासून हितेश हा शरद आणि अलीमसोबत काम करत होता. ७ फेब्रुवारीला हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून किरकोळ करणाहून वाद (Crime News) झाले. यात हितेश याने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली होती. यातून संतापलेल्या अलीम याने हितेश याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. यात हितेश हा जागीच मयत झाला.

शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे घटनास्थळी आले आणि त्यांनी हा प्रकार पाहता आपल्या हातून बटाईसाठी घेतलेली जमीन जाईल. गावात बदनामी होईल या चिंतेने त्यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेशचे शीर वेगळे करत धड गोदावरी नदीत टाकून दिल्याचे संशयितांनी पोलीस चौकशीत सांगितले. तर या घटनेतील मयताचे शीर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून, मिळून आलेल्या मृतदेहाची पूर्णपणे ओळख पटवणे पोलिसांना यश न आल्याने अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. गोदावरी नदी पात्रात मिळून आलेला शीर नसलेला मृतदेह नेमका कोणाचा हे मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT