Panchvati Police station Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : हटकल्याचा राग डोक्यात गेला, तरुणांच्या टोळक्याचा पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला

Group Attacked on Police: नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भररस्त्यात चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पोलिस गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भरचौकात चाकू हल्ला करण्यात आला. नामदेव सोनावणे असं या पोलिसाचे नाव आहे. रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना नामदेव सोनावणे यांनी हटकले होते. याचाच राग मनात ठेवून टोकळ्याने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात नामदेव सोनावणे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

टोळक्यांनी हल्ला केला असताना सुद्धा नामदेव सोनावणे यांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र या घटनेवरून दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

SCROLL FOR NEXT