Girl Physical Abuse By Father Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिक हादरले! बाप बनला हैवान, पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Girl Physical Abuse By Father: मुलीला बेदम मारहाण करत वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Priya More

तबरेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. बापानेच आपल्या पोटच्या गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या शिंदे पळसे गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या शिंदे पळसे गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. या मुलीला बेदम मारहाण करत वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यावेळी तिच्या आईला मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या आईने नाशिक रोड पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय.

दरम्यान, नंदुरबारमध्ये रविवारी अशीच घटना समोर आली होती. १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या बापाने लैंगिक अत्याचार केले होते. मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या ४० वर्षीय बापाने एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध ठेवले.

धक्कादायक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे ही घटना घडली.आईच्या तक्रारीनंतर बापाविरोधात शहादा पोलिस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT