तबरेज शेख
नाशिक : देवदर्शनासाठी घरातून निघत असलेल्या वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकून दुचाकीवर पड काढला. मात्र या चोराचा पाठलाग करून वृद्ध ननंद आणि भावजईने आरडाओरड करत त्या दुचाकीस्वार चोरट्याला खाली पाडले. चोरटा दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली आहे.
नाशिक रोड भागातील जय भवानी रोडवर चव्हाण मळा येथील वयोवृद्ध ननंद आणि भावजयी दोघे जण देवदर्शनासाठी जात असताना सोमवारी सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. यावेळी एक जण जवळ आला. त्याने पत्ता विचारण्याच्या बनाव करत सौदीराम यांच्या गळ्यातील सोन्याची अडीच तोडे वजनाचे सव्वा लाख रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र तोडून दुचाकीच्या दिशेने पडू लागला.
झडप घालत पकडले पण..
यावेळी या ननंद भावजयीने आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. त्याच्यावर झडप घातली आणि दुचाकीसह त्याला खाली पाडले. यावेळी झालेल्या झाटापटीत चोरट्यानी दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पडून गेला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासून बॅग मध्ये आणखीन दोन सोन्याचे मंगळसूत्रसह चोरट्याची माहिती मिळाली.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे पटली ओळख
दरम्यान हि संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथक रवाना केले आहे. दरम्यान पळून जाणाऱ्या चोरट्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ७५ गुन्हे दाखल असून तो मूळचा राहणारा अमरावतीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.