Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : पाण्याच्या प्रेशर तपासण्याच्या बहाण्याने घरात येत टाकला दरोडा; देवळाली कॅम्प परिसरातील जवानाच्या घरी भर दुपारची घटना

Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्प छावणीच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी जवानांना तोफ गोळ्यांचा प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा संपूर्ण कॅम्प परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात जवानांच्या सन्मानासाठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरात जवानाच्या घरी भर दुपारी दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या देवळाली कॅम्प छावणीच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी जवानांना तोफ गोळ्यांचा प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा संपूर्ण कॅम्प परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो. मात्र शुक्रवारी दुपारी कॅम्प परिसरात जवानांसाठी बांधण्यात आलेल्या कारगिल ईनक्लेव्ह बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यामध्ये एका जवानाच्या पत्नी लहान मुलांसोबत घरी असताना संशयित आरोपी घरी पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या बहाणा करून घरात प्रवेश केला. 

चार लाखांचे दागिने घेऊन पसार 

घरातील नळ चेक करून महिलेचे लक्ष विचलित केले. यानंतर जवानाच्या पत्नी आणि लहान मुलाला धमकी देत घरातील आणि महिलेने परिधान केलेले अंगात असलेल्या जवळपास ४ लाखांचे दागिने घेत महिलेला चापट मारली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देवून अर्धनग्न अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन घरातून निघून गेला. त्यामुळे जवानांचे कुटुंब प्रचंड घाबरले होते. 

देवळाली पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान जवान कामाहून रात्री घरी आले असता पत्नीने घाबरत घाबरत घडलेली घटना सांगितली. यानंतर जवानाने पत्नी आणि मुलाला घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्र तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT