Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : जुन्या भांडणातून मुलाचे अपहरण; टोळक्याने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Nashik News : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने राजा सिंग या मुलाचे अपहरण केले

Rajesh Sonwane

तरबेज शेख 
नाशिक
: मुलांमध्ये झालेल्या भांडणाला दोन दिवस झाल्यानंतर या भांडणातून आठवीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून एका टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अल्पवयीन मुलाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी (Nashik) नाशिकच्या अंबड पोलीस (Police) ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

स्वामीनगर (अंबड) येथील राजा गब्बर सिंग (वय १६) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने राजा सिंग या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर या टोळक्याने राजा सिंग याला विल्होळी जवळील एका स्टोन खडी क्रशरजवळ उचलून नेत त्याला बेदम मारहाण केली. या (Nashik Crime News) मारहाणीत मार लागल्याने राजा सिंग याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे लक्षात येतात टोळक्याने त्याचा मृतदेह राजूर बहुला या परिसरातील एका निर्जन भागात नेऊन टाकला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७ संशयितांना पोलीस कोठडी 

दरम्यान राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. यावरून तपास केला असता वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी जात शहानिशा केली असता अपहृत राजा सिंग याचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या हत्या प्रकरणी अंबड पोलिसांनी एकूण ७ संशयित आरोपींना अवघ्या काही तासात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमच्ये शुभम करंजकर, प्रवीण गोवर्धने, अमन खरात, निखिल पगारे, संतोष वाघमारे, सिद्धार्थ दाभाडे, भय्या साळवे अशी नवे आहेत. या सातही आरोपींना कोर्टात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT