Dombivali Crime: दागिन्यांसह आठ वर्षाच्या मुलीलाही उचलून नेण्याचा प्रयत्न; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivali News :बेडरुमसह संपूर्ण रूममध्ये शोध घेतला. या चोरट्याला घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले आठ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड मिळाली. चोरी करुन झाल्यावर त्या दोघांनी त्या मुलीला उचलून फरार
Dombivali Crime
Dombivali CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: आठ वर्षाची मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून दोन चोरटे घरात घुसले. मुलगी वॉशरूममध्ये असताना या मुलीला बांधून तिच्या तोंडात कपड्याचा गोळा कोंबून घरातील रोकड व सोन्याचे दागिने (Crime News) असे मिळून एक लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. चोरटे इथेच थांबले नाही तर त्यांनी या मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना (Dombivali) डोंबिवली पूर्व परिसरात घडली. (Tajya Batmya)

Dombivali Crime
Sakri News : दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीची सुटका; संशयित आरोपीही ताब्यात

डोंबिवली पूर्वेतील नांदीवली टेकडी परिसरात वैद्यकीय व्यवसायात असलेले वडील कामावर गेले. तर आई शेजारी काही कामानिमित्त गेली होती. याच वेळी अचानक एक व्यक्ती घरात घुसला तर दुसरा दाराआड लपून बसला होता. यावेळी घरात असलेली आठ वर्षाची मुलगी वॉशरुममध्ये गेली होती. हा अज्ञात व्यक्ती वाशरुममध्ये घुसला. त्याने त्या मुलीचे हातपाय आणि तोंड बाधून बाल्कनीत ठेवले. यानंतर घरातील हॉल, बेडरुमसह संपूर्ण रूममध्ये शोध घेतला. या चोरट्याला घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले आठ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड मिळाली. चोरी करुन झाल्यावर त्या दोघांनी त्या मुलीला उचलून फरार होत होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivali Crime
Sakri Crime: धक्कादायक..सशस्त्र दरोडा टाकत तरुणीचेही केले अपहरण

मुलीने दाखविले धाडस 

मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने त्यांना प्रतिकार केला. मुलीने धाडस दाखवत हिसका देत पुन्हा घराच्या दिशेने पळ काढला. आई आल्यानंतर तिने सर्व प्रकार कथित केला. यानंतर मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. डोंबिवलीत दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com