Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार; अंगात दैवी शक्ती असल्याचे भासविले, पत्‍नी– मुलांचाही सहभाग

भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार; अंगात दैवी शक्ती असल्याचे भासविले, पत्‍नी– मुलांचाही सहभाग

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये भोंदू बाबाकडून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगात दैवी शक्‍ती असल्‍याचे सांगत तसेच आमिष दाखवून (Crime News) अत्‍याचार केला. याबाबत उपनगर पोलिस (Police) ठाण्यात भोंदू बाबासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या एका भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शाररिक संबंध केले. याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत आणि अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते.

महिलेकडून उकडले ५ लाख

तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे ५ लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या संपूर्ण घटनेत विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबासह त्याची पत्नी सुनिता विष्णु वारुंगसे, उमेश विष्णू वारुंगसे व आणि देवबाबा याची मुलगी अश्या चौघांविरोधात उपनगर पोलिसांत ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जादूटोणा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर आरोपी फरार असून उपनगर पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Jalgaon Accident : निवडणूक ड्युटीसाठी जाताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rinku Rajguru: आर्चीला पाहून म्हणाल सैराट झालं जी...

SCROLL FOR NEXT