तबरेज शेख
नाशिक : नाशिकच्या सामनगांव येथे वयोवृद्ध महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करत १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने लंपास केल्याची घटना घाडली होती. या प्रकरणी (Nashik) नाशिकरोड पोलिसांनी (Police) तपास लावत आरोपीकडून २८ तोळे सोन्याचा मुद्देमाल जप्त केला असून एकुण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Maharashtra News)
नाशिकच्या सामनगांव येथील महिला शकुंतला दादा जगताप (वय ७५) या १ जानेवारीला दुपारी दुकानात असतांना पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या एका अज्ञाताने दुकानात येवून त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने (Crime News) त्यांना गंभीर दुखापत केली. यांनतर त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत व इतर दागिने असे एकुण ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ च्या पथकाने संशयित आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यास ताब्यात घेतले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
साडेसोडा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
अटक केलेल्या आरोपीने सुरुवातीस ३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याने वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा/रॉड, प्लेजर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास केला असता आरोपीने एकुण ७ गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेवून सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मन्याची पोत, सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत, सोन्याचे कर्णफुल व वेल आदी एकुण २८ तोळे वजनाचे सोन्यांचे दागिने व लगड असा १६ लाख ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे, हर्षल चंद्रकांत म्हसे, चेतन मधुकर चव्हाण या तिघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उपआयुक्त श्रीमती मोनिका, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.