nashik crime news  saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News | लग्नाच्या तीन महिन्यांनी विवाहित महिलेने संपवले जीवन; नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) विवाहित महिलेने धक्कादायक पाऊल उचललं आहे.

Vishal Gangurde

तरबेज शेख

नाशिक : नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) विवाहित महिलेने धक्कादायक पाऊल उचललं आहे. तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका १८ वर्षीय विवाहित महिले राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Crime News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी परिसरातील गौरी भावसारचा तीन महिन्यापूर्वीच भद्रकाली परिसरातील मयूर भावसार या मुलासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, शनिवारी रात्री सासरी पंख्याला गळफास घेत गौरीने आत्महत्या केली आहे. गौरीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गौरीच्या कुटुंबीयांकडून तिला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांकडून सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. सासरच्यांना अटक न केल्यास अंत्यविधी करणार नाही, अशी आक्रमक भूमिका गौरीच्या माहेरच्या लोकांनी घेतली.

दरम्यान, गौरीच्या माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेह अमरधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. भद्रकाली पोलिसांनी सासू आणि सासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेताच अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

SCROLL FOR NEXT