Nashik Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: धक्कादायक! केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवून मुलीची ८० हजारात विक्री; नाशिकमध्ये खळबळ

Nashik News Update: केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून देत तिला 80 हजारात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik Crime News: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीस केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून देत तिला 80 हजारात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत नाशिकच्या एका अल्पवयीन मुलीचे हैदराबाद (Hyderabad) येथील तरुणांशी बळजबरीने विवाह लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीला फूस लावून 80 हजारात तिचा सौदा करत हैदराबाद येथील तरुणाशी आळंदीमध्ये बळजबरीने विवाह लावून दिला. त्यानंतर तिला हैदराबादमध्ये डांबून ठेवले.

मुलीने हुशारी दाखवत तुम्ही माझा घरी चला माझ्या घरच्यांना सांगा असं सांगत घेऊन पुण्यात (Pune) आली.यावेळी स्थानिकांनी तिला विचारणा केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला, ज्यानंतर तिच्या कुटूंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली.

सध्या मुलीला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित महिला व एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT