Nashik Crime News SaamTv
महाराष्ट्र

Nashik News: वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनी एजेंटवर प्राणघातक हल्ला; ज्वलनशील पदार्थ टाकला अन्...

Attack On Finance Company Agent: अंबड वसाहतीत ही घटना घडली असून यामध्ये दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik Crime News : वसूलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचारी आणि त्याच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड वसाहतीत ही घटना घडली असून यामध्ये दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको (Nashik) वसुलीसाठी गेलेल्या एका फायनान्स कंपनीच्या एजंटसह त्याच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. गणेश बापूराव फाफळे (वय ३४ रा विडी कामगार नगर) किरण भास्कर फाफळे (वय ४० रा गणेश चौक )असे हल्लात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुनील देशमुख (रा .दातीर मळा अंबड) याने बजाज फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी गणेश बापूराव फाफडे यांनी फोन केला असता त्यांना पैसे घेण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत बोलावले.

यावेळी गणेश फाफळे यांनी त्याच्याकडे थकीत पैसाची मागणी केली असता संशयित आरोपी देशमुख याने त्यांना शिवीगाळ करत बॉटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश फापळे व त्यांचा सोबत असलेले त्यांचा मित्र किरण फाफळे यांच्या अंगावर टाकला. या दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

SCROLL FOR NEXT