Nashik Crime: डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात धक्कादायक खुलासा  अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik Crime: डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात धक्कादायक खुलासा

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळीतकांड प्रकरणी रोज काहीतरी खुलासे समोर येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकः महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा (Dr. Suvarna Waje) वाजे यांच्या जळीतकांड प्रकरणी रोज काहीतरी खुलासे समोर येत आहेत. मात्र, या प्रकरणाचा गुंता काही केल्या सुटायला तयार नाही. एकीकडे डॉ. सुवर्णा वाजे यांना ठार मारण्यातला प्रमुख संशयित आणि मास्टरमाईंड (Mastermind) संदीप वाजे म्हणावे तसा घडाघडा बोलत नाहीत. शिवाय त्याला खुनप्रकरणात (Murder) मदत करणाऱ्या त्याच्या मित्रापर्यंत पोलिसांचे (police) अजून देखील पोहचले नाहीत. कारण संदीप वाजेच्या २ मित्रांवर पोलिसांना संशय आहे. (Nashik Crime Another big revelation in the arson)

मात्र, त्याच्या विरोधामध्ये ठोस पुरावे सापडत नसल्याने पोलिसांची कोंडी झाल्याचे चिडून येत आहे. आता विशेष म्हणजे डॉक्टर सुवर्णा वाजे यांच्या कुटुंबाची पोलिसांनी (police) परत एकदा चौकशी करण्यात आली आहे. यातून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीतून परत एकदा पुराव्यांची जुळवाजुळव करणे सुरू आहे. यामध्ये अजून एक खुलासा देखील समोर आला आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांना पतीने अतिशय थंड डोक्याने विचार करून क्रूरपणे संपवले आहे. त्याकरिता नियोजनबद्ध रितीने कट करण्यात आला होता. डॉ. सुवर्णा वाजे २५ जानेवारीच्या रात्री काम संपवून क्लिनिक मधून बाहेर पडले होते.

हे देखील पहा-

मुंबई- आग्रा महामार्ग परिसरात पोहचले होते. हे सारे त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून समोर आले आहे. आता पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच दिवशी रात्री डॉ. सुवर्णा वाजे ज्या वेळेस त्या भागात पोहचले होते. त्यावेळेस संदीप देखील तेथे असल्याचे समोर येत आहे. संदीपच्या मोबाइलचे लोकेशन देखील त्यादिवशी मुंबई- आग्रा महामार्ग परिसरात आढळले आहे. यामुळे संदीप भोवतीचा फास आणखी एकदा घट्ट झाला आहे. संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचं होतं. यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटत असायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्याकरिता ५० लाख रुपयांची मागणी केली होती. (Nashik Crime Another big revelation in the arson)

मात्र, त्याच्याकडे इतका पैसा नव्हता. यावरून त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडत असायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद- विवाद होत असायचे. यामुळे त्याने डॉ. सुवर्णा वाजे यांचा काटा काढायचे ठरवले होते. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला पती संदीपने नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले होते. त्यांचा खून करून इतर ५ जणांना बरोबच घेत पत्नीला जाळले आहे. दुसरीकडे संदीपने मोबाईल मधील डेटा डिलीट केला होता. तो रिकव्हर झाला असून, त्यातून त्यांच्यात भांडण आणि वाद सुरू असल्याचे समोर दिसून आले आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांना संदीपने एकदा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही सारी माहिती क्लिनिक मधील सहकाऱ्यांना सांगितली होती. संदीपकडे पोटगीकरिता ५० लाखांची मागणी केल्याची देखील माहिती दिली होती. आपले कधी काही बरेवाईट झाले, तर क्लिनिकमध्ये ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना द्यावी, असे सांगितले होते. यावरून डॉ. सुवर्णा वाजे यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती आणि चिठ्ठी पोलिसांना दिली आहे. यातून या साऱ्या प्रकरणाचा अजून खोलवर उलगडा झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT