पुणे : तळेगाव (Talegaon) नगरपरिषदेच्या भुमिगत गटार आणि विद्युतीकरण कामाकरिता अमाप वृक्षतोड करणा-या कंत्राटदार विरोधामध्ये तसेच त्यांना पाठीशी घालणारे नगरपरिषद (Municipal Council) आणि राजकारण्या विरोधात वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता जनसेवा विकास समितीने "कोण आहे पुष्पा?" असे फ्लेक्स जागोजागी लावल्यामुळे नागरिकांची उत्सुकता आणखीच ताणली आहे. (Who is Pushpa from Talegaon pune)
हे देखील पहा-
या फ्लेक्सवर कु-हाड झाडावर घाव घालतानाचे प्रतिकात्मक चित्र देखील छापण्यात आले आहे. तळेगांव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स्टेशन विभागातील तळयामधील गाळ, माती, मुरुम लोक सहभागातून काढण्याच्या कामात मोठया प्रमाणावर खर्च झाल्याविषयी नगर विकास विभागाने तत्कालीन 7 नगरसेवकांसह (corporators) नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जवळपास 80 कोटी रुपयांचा दंड त्यांच्यावर ठोठावण्यात आला आहे.
त्याप्रकरणी सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता या नव्या वृक्षतोड प्रकरणी नागरिकांसह जनसेवा विकास समितीने मुख्यधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला (administration) धारेवर धरले जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा विकास समितीकडून लावण्यात आलेली ही अगदी समर्पक पोस्टर्स तळेगाव लाकूड तस्करांबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांकडे लक्ष वेधत आहेत. मुख्यधिकाऱ्यांनी काढलेल्या नोटीसीच्या आधारे तपासानंतर तळेगावचा पुष्पा कोण? ते बघण्यासाठी नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.