मुंबई : मुंबईतील कारमायकल रोडवर (mumbai carmichael road) स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. आता त्यांच्या विधानामुळे त्यांना चौकशीला सामोरं जाव लागले आहे. चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission ) नवाब मलिक (nawab malik) यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. (Minority Minister Nawab Malik Chandiwal appeared before commission)
हे देखील पहा-
चांदिवाल आयोगासमोर आज मंत्री नवाब मलिक हे हजर झाले आहेत. नवाब मलिक यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसुख हिरेन हत्या आणि अॅटिलिया स्फोटाचा मास्टर माइंड परमबिर असून वाजेही त्याच गुन्ह्याचा भाग असल्याचे वक्तव्य केले असल्याचा युक्तिवाद वाजेचे वकिल योगेश नायडू यांनी केला होता. याबाबतचे व्हिडिओ देखील वायरल झाले होते. यातून थेट आरोप वाजेंवर यात वाजेंची बदनामी केली जात असल्याचे स्पष्ठ दिसत असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले होते.
मंत्री नवाब मलिक यांना चांदिवाल आयोगाने याविषयी नोटीस बजावली आहे. आज आयोगात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आला आहे. चौकशी सुरू असताना मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना नोटीस बजावली आहे. मलिक यांनी काही दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले होते. कार मायकल रोडचे मुख्य सुत्रधार सचिन वाझे आणि परमबीर सिंग असल्याचे वक्तव्य केले होते. यावर सचिन वाझेने आक्षेप घेतला आहे. सचिन वाझेनं चांदीवाल आयोगात अर्ज केला होता. त्यामुळे नवाब मलिकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.