Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: धक्कादायक! अजित पवार गटातील आमदाराच्या पेट्रोल पंपावर हल्ला; संपर्क कार्यालयाचीही तोडफोड

Nashik News: या हल्ल्यात पेट्रोल पंप तसेच कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News: नाशिक जिल्ह्यातून (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या कळवण (kalwan) तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंप व संपर्क कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Crime News IN Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन पवार हे नाशिकच्या (Nashik) कळवण सुरगाणा तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आहेत. कळवणच्या मानूर शिवारात त्यांचा पेट्रोल पंप तसेच संपर्क कार्यालय असून पहाटे ३ वाजता चार जणांकडून पेट्रोल पंप तसेच कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

या हल्ल्यात पेट्रोल पंप तसेच कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक तपासात पेट्रोल न दिल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नितीन पवारांचा अजित पवारांना पाठिंबा..

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असून नितीन पवार (Nitin Pawar) यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar-Marine Drive: आनंदाची बातमी! आता विरारवरुन थेट मरीन ड्राईव्ह, फक्त ४५ मिनिटांत, वाचा नेमका प्लान काय?

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

भरधाव कारने ८ जणांचा चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

Protein Bar Recipe : जीममधून आल्यावर खा 'हा' प्रोटीन बार, मिळेल तुफान एनर्जी

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?

SCROLL FOR NEXT