BJP workers expressing anger in Nashik after ticket allocation to Sudhakar Badgujar’s family. saam tv
महाराष्ट्र

Nashik Politics: सुधाकर बडगुजरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी; भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

Nashik Corporation Election: नाशिकमध्ये भाजपमधील असंतोष प्रकर्षाने समोर आलाय. आयारामांना महत्व दिल्याने त्यांना तिकीट दिल्याने निष्ठावंत नाराज झालेत. नाशिकमध्ये निष्ठावंतच कसे उपरे ठरलेत ? पाहूया या रिपोर्टमधून.

Girish Nikam

  • नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत असंतोष उघड

  • बडगुजर कुटुंबातील तिघांना उमेदवारी

  • निष्ठावंत कार्यकर्ते आणि सीमा हिरे समर्थक संतप्त

महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपमधला असंतोष चव्हाट्यावर आलाय. आयारामांनाच झुकतं माफ दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांनी बाजी मारली आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलून बडगुजर यांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वत: सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपने संधी दिली.

यामुळे हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत. जे पक्षाच्या निर्णयाविरोधात जातील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांच्यासाठी भाजपने दार उघडलं.

दुसरीकडे भाजपने 'घराणेशाही'ला लगाम घालत आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का दिला आहे. नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याच्या धोरणामुळे, वाजतगाजत अर्ज भरणाऱ्या फरांदेचा मुलगा अजिंक्य फरांदे आणि हिरे यांची कन्या रश्मी हिरे यांना अखेर माघार घ्यावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बडगुजरांसारख्या आयारामांना महत्व देण्यात आल्याने भाजपचा जुना कार्यकर्ता मात्र दुखावला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT