Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: नाशिक पोलिसांची कारवाई; ३०० कोटीपेक्षा जास्त रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त

Nashik Crime: नाशिक पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची किमत ३०० कोटीपेक्षा जास्त आहे.

Bharat Jadhav

Nashik Police Recovered MD Drug :

नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी एमडी ड्रग्ज मोठा साठा जप्त केलाय. पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची किमत ३०० कोटीपेक्षा जास्त आहे. दरम्यान काल मुंबई पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केलाय. शिंदे गावातच दुसरी कारवाई झाल्यानं मोठी खळबळ माजली. (Latest Crime News)

शिंदे पळसे परिसरात ड्रग्जचा कारखाना

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पोलीस ड्रग्जविरोधी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत १५० किलोपेक्षा एमडी ड्रग्ज जप्त केले. श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू होती. ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात हा ड्रग्सचा कारखाना चालवत होता.

माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी कारवाई करत कारखाना उद्ध्वस्त केलाय. तब्बल तीन दिवस सुरू असलेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनी मालकासह कामगारांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, नाशिक पोलिसांनीही शहरातील वडाळागाव भागातील सादिकनगरमध्ये छापा टाकून ड्रग्स विकणाऱ्या एका महिलेसह आणखी एकाला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT