nashik city link bus service collapsed today saam tv
महाराष्ट्र

Nashik City Bus Service : सिटी लिंक बस सेवा ठप्प, कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

Nashik City Link Bus Employees Strike : गेल्या महिन्यात देखील सिटी लिंक बस सेवा कर्मचा-यांनी तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने संप पुकारला हाेता.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik :

दाेन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवेच्या (Nashik City Bus Service) कर्मचा-यांनी आज (गुरुवार) पुन्हा एकदा काम बंद आंदाेलन छेडले आहे. यामुळे सिटी लिंकच्या तपोवन बस डेपोतील (tapovan bus depot) बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र सकाळ सकाळी पाहयला मिळत आहे. (Maharashtra News)

सिटी लिंक बसच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने आश्वासन देऊनही वाहकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. यामुळे कर्मचा-यांनी तपोवन बस डेपोमधून बस बाहेर काढण्यास आज नकार दिला. त्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. परिणामी शहर बस वाहतुकीच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.

गेल्या दीड वर्षातील वाहकांनी पुकारलेला आजचा हा 8 आठवा संप आहे. बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित स्थळी जावे लागत आहे. परिणामी नाशिककरांना आर्थिक भुर्दंड साेसावा लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप आमदाराची शिंदेंच्या आमदारावर शिवराळ भाषेत टीका|VIDEO

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

Genelia Deshmukh Photos: जेनेलियाचं स्टनिंग फोटोशूट, मादक अदांनी चाहते झाले घायाळ

SCROLL FOR NEXT