Nashik Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Renaming : औरंगाबादच्या नामांतरावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांची इच्छा....'

औरंगाबाद शहराच्या नामकरणावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shivani Tichkule

Nashik Chhagan Bhujbal : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचं सर्वच राजकीय स्तरातून कौतुक केलं जात आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छत्रपती औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) नामांतरावर भाष्य केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षापासून मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे. ते आपल्या वर्तमानपत्रातून आणि भाषणातून सुद्धा औरंगाबादला संभाजीनगर असे म्हणायचे आणि उस्मानाबादला ते धाराशिव म्हणायचे असे भुजबळ म्हणाले.

"ज्यावेळी महाविकास होती त्या वेळी मंत्रिमंडळानेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही ठराव मंजूर केले होते. आनंद आहे की बाळासाहेबांची जी इच्छा होती आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची जी मागणी होती ती आता मंजूर करण्यात आली आहे. थोडे दिवस आता जे लोक संभाजीनगर नाव वापरत नव्हते त्यांच्या तोंडात औरंगाबाद वगैरे येत राहील. परंतु हळूहळू सवय होईल. जस बॉम्बेचं मुंबई झालं तस हळूहळू औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव म्हणायची लोकांना सवय होईल, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 4 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला. त्यानंतर 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमार हटवा, SIR याद्या गोठवा; मुंबईतील आंदोलनापूर्वी दिपकेंची मागणी

Fact Check: तुम्ही खाताय प्लास्टिकची अंडी? अंडी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने स्पष्टच सांगून टाकलं,गिलच्या कॅप्टनशीपवरही भाष्य

SCROLL FOR NEXT