Chandwad Politics Heats Up After Shocking Audio Clip Viral Saam
महाराष्ट्र

'मशीनवाल्याशी बोलणं झालंय, भाजप उमेदवाराला मतं मिळतील अन् तुलाही..' AUDIO क्लिप व्हायरल, चांदवडमध्ये खळबळ

Chandwad Politics Heats Up After Shocking Audio Clip: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदवडमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला या निवडणुका पार पडतील. अशातच चांदवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. एक कथित ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

चांदवड येथील नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी ऑडिओ क्लिपबाबत माहिती दिली. अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना शक्ती विलास ढोमसे यांनी मोबाईलवर संपर्क साधला होता. ढोमसे यांनी अहिरे यांना ठराविक रकमेच्या बदल्यात निश्चित मते मिळवून देण्याची ऑफर दिली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही संपूर्ण कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये गेल्या काही तासाभरापासून व्हायरल होत आहे. यामुळे चांदवडमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

अहिरे यांनी सांगितले की, 'ढोमसे यांचा फोन आला होता. त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना १३ हजार ६४२ मते मिळणार असल्याचा दावा केला. यासंदर्भात त्यांना मी प्रश्न विचारला. हे कसे शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्यांनी "मशीनवाल्याशी बोलणं झालंय", असं सांगितलं. "एक कोटी दिल्यास तुलाही ११ हजार २५० मते मिळवून देऊ", अशी ऑफरही दिली', अशी माहिती अहिरे यांनी दिली.

या संभाषणानंतर ही कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यांमध्ये व्हायरल झाली. ही ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि चांदवड पोलिसांना देत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनची डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने, चांदवडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Migraine Pain: मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणं अत्यंत महत्वाचं

Diabetes Bad Habits: डायबेटिसचा त्रास आहे? ही १ वाईट सवय झटक्यात वाढवते ब्लड शूगर लेव्हल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

Maharashtra Politics: अजित पवारांची धक्का एक्स्प्रेसस सुसाट! बड्या नेत्यांनी हाती बांधले घडयाळ

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभूच्या हाउंडस्टूथ प्रिंट सिल्क साडीने वेधले नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा ग्लॅमरस फोटो

Maharashtra Live News Update: यवतमाळ पालिकेत भाजपचा बंडखोर विजयी

SCROLL FOR NEXT