Nashik Political News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचा विराट मोर्चा, पोलिस अन् पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची; नाशिकमध्ये काय घडलं?

Nashik Political News: नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाही करण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

अभिजीत सोनवणे, नाशिक|ता. ४ डिसेंबर २०२३

Nashik Breaking News:

गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. हिंगोली, नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळल्याने हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले.

नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाही करण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून आज (सोमवार, ४ डिसेंबर) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik) अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ८९० गावांतील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला.

या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याासाठी ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) कार्यालयापासून या मोर्चाला सुरवात झाली. मोर्चामध्ये शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चातील सहभागी झालेल्या बैलगाड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस- मोर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची..

दरम्यान, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जात असताना पोलीस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मोजक्या पदाधिकाऱ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी जावे, अशी भूमिका घेतल्याने हा वाद झाला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसेच शाब्दिक बाचाबाची झाली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT