Maharashtra Politics SAAM Digital
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये भाजपला भगदाड! नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे, विधानसभेला सख्खे भाऊ भिडणार?

Nashik Assembly Election 2024: चांदवड-देवळा मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत आपले चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी पक्षाकडे मागणी केली होती.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अशातच नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या देवळा-चांदवड मतदार संघातील भाजपच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष अशा 15 नगरसेवकांसह 2 स्वीकृत तसेच अन्य सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारीच्या नाराजीतून हे राजीनामे दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या देवळा-चांदवड मतदार संघातील भाजपच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष अशा 15 नगरसेवकांसह 2 स्वीकृत तसेच अन्य सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चांदवड-देवळा मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत आपले चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी पक्षाकडे मागणी केली होती.

सख्खे भाऊ भिडणार!

राहुल आहेर यांनी माघार घेतल्याने केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते. मात्र पहिल्या यादीत डॉ राहुल आहेर यांचे नाव आल्याने देवळा येथील केदा आहेर यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे त्यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे केदा आहेर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चांदवड-देवळा मतदार संघात दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात आमने- सामने येणार आहेत.

दिंडोरीमध्येही बंडाचा झेंडा

दुसरीकडे नाशिकच्या दिंडोरीमध्येही महायुतीच्या इच्छुकांनी बंडाचे झेंडे फडकावण्याचा इशारा दिला आहे. दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धनराज महाले हे लढण्यास इच्छुक होते, मात्र दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आणि नरहरी झिरवाळ यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याने धनराज महाले बंडाच्या तयारीत असून २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धनराज महाले यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्ही का पाळायचा? असा सवालही त्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT