Nashik Accident News: चांदवड Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात; १२ जखमी

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक

Nashik Police Van Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. चांदवड जवळील राहुड घाटात ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातात नाशिक ग्रामीणचे १२ पोलीस जखमी झालेत. जखमी पोलिसांवर चांदवडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालमकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड जवळील राहुड घाटात ही मोठी दुर्घटना घडली.

या अपघातात नाशिक ग्रामीण पोलिसचे १२ पोलीस जखमी झालेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या चांदवडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही पोलिसांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची माहिती समोर आली नाही.

दरम्यान, सोलापूर महामार्गावरच्या बुधोडा ( पेठ )या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे .,तर पती आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचेही समोर आले आहे. इकरा सादीक शेख, आणि नादिया शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या; प्रवीण तरडे असे का म्हणाले?

Shahapur Crime : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल

Maharashtra News Live Updates: राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द

Sharad Pawar: 'माझा राजा असा नव्हता', हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज? इंदापूरात बॅनरबाजी

Ahilyanagar : अहमदनगर बनलं अहिल्यानगर, निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT