Nashik Leopard Attack News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Leopard Attack: रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणावर अचानक बिबट्याने मारली झडप; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO

Nashik News Today: गुलमोहर कॉलनी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

साम टिव्ही ब्युरो

Nashik Leopard Attack News: नाशिक शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुलमोहर कॉलनी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. या घटनेत तरुणाच्या पायाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील गुलमोहर कॉलनीतून एक तरुण रस्त्याने पायी जात होता. डॉक्टर कनौजीया यांच्या बंगल्याजवळ तो आला असता, अचानक एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याला पाहून या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली.

एका कारचालकाने वेळीच कार त्याच्याकडे वळवल्याने बिबट्या पळून गेला. कारचालकामुळे या तरुणाचे प्राण वाचले. या घटनेत तरुणाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुण रस्त्याने जात आहे. त्याच्या आजूबाजूने काही वाहनेही जाताना दिसत आहे. मात्र, त्याचवेळी अचानक एक बिबट्या मागून धावत येतो आणि या तरुणावर हल्ला करतो.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : १५०० रुपयात महिलांना विकत घेतलं जातंय, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचा हल्लाबोल

गुजरातची दोन माणसे महाराष्ट्र चालवताय; भीमाशंकरच्या वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा घणाघात

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या हातात काहीच नाही- राज ठाकरे

Silver Anklets for Women: महिलांसाठी 10-15 ग्रॅम चांदीमध्ये बनवा पैंजणाच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स

50 वर्षांपेक्षा कमी असलेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झपाट्याने का वाढत आहे? तज्ज्ञांनी सांगीतले यामागील खरे कारण

SCROLL FOR NEXT