Sangola Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident Video: सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव पिकअप उलटले, २ महिला मजूरांचा मृत्यू; २० जखमी

Sinnar- Shirdi Highway Accident:सिन्नर- शिर्डी महामार्गाची सफाई, गवत काढणे या कामाचं कंत्राट घेतलेल्या कंपनीसाठी या महिला मजूर काम करत होत्या. सायंकाळी घरी जाताना पीकअप उलटून भीषण अपघात झाला.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २० जून २०२४

नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर शिर्डी महामार्गावर पिकअप गाडी उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात २ महिला मजुरांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर शिर्डी महामार्गावर वावीजवळ पिकअप गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव पिकअप उलटून झालेल्या या अपघातात २ महिला मजुरांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिन्नर- शिर्डी महामार्गाची सफाई, गवत काढणे या कामाचं कंत्राट घेतलेल्या कंपनीसाठी या महिला मजूर काम करत होत्या. संध्याकाळी ठेकेदाराच्या गाडीतून त्या कामावरुन परतत होत्या. वावी गावाजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरघाव गाडी उलटली.

या दुर्घटनेत २ महिला मजूरांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की गाडीवरील मजूर दूरवर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT