Nashik Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime: पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये गेला.. दुसऱ्या दिवशी तळघरात मृतदेह आढळला; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Breaking News: नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक|ता. १३ एप्रिल २०२४

नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नवीन बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश किरण काळे (वय, ३८ रा. इंदिरा वसाहत नवी. नाशिक) असे या मृत रुग्णाचे नाव आहे. आकाश काळे हा नेहमी मद्य सेवन करीत असल्याने त्याला पोटामध्ये त्रास होत होता. त्यामुळे दिनांक 10 एप्रिल रोजी त्याला उपचारासाठी नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्याने रुग्णालयातून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले असता तो बेडवर आढळून आला नाही. त्यामुळे नातेवाईक व त्याच्या मित्र परिवाराने शोध घेतला. परंतु आकाश कुठेच न सापडल्याने अखेर सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असता तो तळघरातील जिना उतरून खाली जाताना दिसला त्यानंतर तळघरात थेट त्याचा मृतदेह आढळला.

दरम्यान, याबाबतची माहिती नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन चौकशी केली. या प्रकरणावरुन नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे.

रुग्ण रुग्णालयातून बाहेर जात असताना डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते का? हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी सुरक्षा आहे. हे सुरक्षा कर्मचारी झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल नागरिक व इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

आता हिंदु देवतांचेही 'धर्मांतरण'; काली मातेची केली मदर मेरी

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT