CM Gram Sadak Yojana Road  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Breaking: सिन्नरमधील ६ कोटींचा रस्ता महिनाभरातच उखडला; ग्रामस्थांनी अक्षरश: चटईसारखा गुंडाळला, पाहा VIDEO

CM Gram Sadak Yojana Road Demolished Within Month On Vavi Shaha: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता महिनाभरात उखडला आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता महिनाभरात उखडला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वावी ते शहा रस्त्यावर महिनाभरात जागोजागी खड्डे पडल्याचं दिसत आहे. या रस्त्याची दुरावस्था झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता

नाशिक जिल्ह्यात वावी ते शहा या रस्त्यावरील डांबराचा थर हाताने (Nashik News) निघतोय. या रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी ४१ रुपये खर्च करण्यात आले होते. केवळ महिनाभरापूर्वीच या रस्त्याचं काम पूर्ण झालंय. त्यानंतर लगेचच रस्त्याच्या गुणवत्तेची पोलखोल झालीय. सिन्नर तालुक्यातील वावी ते शहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली.

डांबरीकरणाचा थर हातांनी निघतोय

रस्त्याचं काम करणाऱ्या बांधकाम विभाग आणि ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली (Nashik Breaking) आहे. अजून फारसा पाऊस देखील झालेला नाही, असं असताना रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. डांबरीकरणाचा थर हातांनी देखील निघू लागलाय. वावी ते शहा रस्ता गेल्या 30 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत (CM Gram Sadak Yojana Road) होता. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकतेच करण्यात आलं होतं.

ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

त्यासाठी तब्बल ६ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र, या कामाची गुणवत्ता उघडी पडली असून या कामावर नियंत्रण ठेवणारा बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची चौकशी ( CM Gram Sadak Yojana Road Demolished) करावी, रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. महिनाभरातच रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT